एकूण पृष्ठदृश्ये

हिरवा प्रकाश

रंगीत हे मेघ | नभाच्या अंगणी |
ओलीचिंब गाणी | पावसाची ||

अफाट अनंत | धरणी आकाश |
हिरवा प्रकाश | जिथे-तिथे ||

आनंद सर्वत्र | कणकणवासी |
नाते हे प्रेमाशी | जुळलेले ||

निर्मळ, प्रेमळ | अंतरंग जे-जे |
मनाशी पाहिजे | माझ्या तेच ||


हिण तत्व सारे | प्रस्थापण्यासाठी |
करी उठाउठी | वीट त्याचा ||


माणूस म्हणोन | मनो-मनी नांदू |
काळजाला सांधू | माणसाच्या ||


होईल हिरवी | कंच दाट मने |
गाऊ चला गाणे | पावसाचे ||


-मनोज बोबडे