वेगळेपणाचे वैशिष्टय
सृजनात्मक प्रकृती कुणाला प्रिय नसते? ज्याला नसते, तो रसिक म्हणता येत नाही. त्याच-त्यापणात अडकून असणाऱ्या कृती रसिक मनाला डबक्यासारख्या भासत असतील तर नवल ते काय? तिच्यासारखीच ती असणं म्हणजे तिच्या कृतीचं माहात्म्य, तिचा गोडवा हा अप्रतिम असणं आहे. वेगळ्या सामर्थ्याची घडणच तिचं वेगळेपण टिकवून असते. मग तिच्या गुणाचं प्रमाण किती हा भाग अलाहिदा! स्वतंत्र अस्तित्व लेवून असलेलाच आविष्कार, डोळ्यांना, रसिक मनाला सुखावह वाटत असतो. कारण त्या निर्मितीकडे बघताना तो आधीच बघितल्याचा निरस भाव आपल्या लोचनी असत नाही. उलट त्याकडे बघताना एक चमत्कृतीपूर्ण -नजर आपली साथीदारीण झालेली असते. आणि हाच अचंबा आपल्याला उदात्त, उत्तम असा आनंद देणारा ठरतो. फक्त ती रसिकता व वेगळेपणाचं सामर्थ्यही उरी नांदायला हवं!
डॉ. इकबालांचा एक 'शेर' आहे...
जाम्हुर्हियत तर्ज हुकुमत है यारो जिसमे
बंदो को गिना जाता है, तोला नाही जाता|
इकबालांनी असं जे म्हटलं आहे ते उगाच नव्हे! कोणत्याही प्रतिभेला तोलण्याची गरज ती काय? तिची स्वतंत्रपणे मापणी केली गेली पाहिजे !....
हा प्रकार फक्त घडतो तो जनतेच्या राज्यामध्ये-लोकांच्या राज्यामध्ये! मक्तेदारांच्या वा 'तानाशहांच्या' राज्यामध्ये नाही.
म्हणून हटके म्हणतात तो आविष्कार करणारा हा स्वतंत्र गणतीच्या रांगेत उभा असतो. अनुसरणाऱ्यालाच तुलना प्राप्त होत असते. आणि तुलना म्हणजे प्रेरणेपासून फारकत घेणे होय. याचा अर्थ प्रेरणा नाही म्हणजे खाद्य नाही, खाद्य नाही म्हणजे पोषण नाही, पोषण नाही म्हणजे शक्ती नाही, शक्ती नाही म्हणजे कृती नाही, कृती नाही म्हणजे आविष्कार नाही....आणि जिथे आविष्काराच नाही तिथे वेगळेपणाचा आनंद तो काय असणार? तेव्हा तुलनेमुळे एवढे जर नुकसान होत असेल तर खरेच तिची गरज आहे का?.....'नाही' हे उत्तर सुद्न्यांचे असेल!
आपल्या अस्तित्वाला थारा मिळवून देणारी निर्मिती आपल्याकडून घडली तर आपण एक वेगळेच प्रतिभावंत म्हणून परीचयास येऊ! तेव्हा आपली तुलना न होता गिणती होईल, एक प्रतिभावान म्हणून...कलानिर्माता म्हणून...एक श्रेष्ठ आविष्कारक म्हणून...
आणि हे सामर्थ्य असेल आपल्याकडे असणाऱ्या हटके निर्मितीच्या ध्यासाचं !!!
-मनोज बोबडे